आजची वात्रटिका
----------------------------
सत्य कथा
सत्य जाचायला लागले की,
सत्याची दाबादाबी केली जाते.
सत्य बोलायला लागले की,
सत्यासमोर समस्या उभी केली जाते.
तरीही सत्य बधले नाही की,
विरोधात कटकारस्थान रचले जाते.
सत्य पराभूत झाले नाही तरी,
सत्य काही काळासाठी खचले जाते.
कधी सत्य एकटे पाडले जाते,
कधी सत्य एकटे पडले जाते !
सत्यावाचून कुणाचेच नडत नाही
सत्याला त्याचे सत्यपण नडले जाते!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9206
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
3मार्च 2026

No comments:
Post a Comment