Monday, March 30, 2026

लॉकडाऊनच्या अफवा....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
लॉकडाऊनच्या अफवा
आखाती युद्धाच्या कथा,
कोरोनाकडे जायला लागल्या.
लॉकडाऊनच्या अफवा,
वेगाने यायला लागल्या.
लॉकडाऊनचा प्रश्न काही,
एवढा साधासुधा नाही.
आखातातले युद्ध म्हणजे,
संसर्गजन्य बाधा नाही.
एवढी मात्र माफक अपेक्षा,
इंधन वेळेवर आले पाहिजे !
कोरोनाच्या अफवेखोरांना,
क्वारंटाईन केले पाहिजे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9232
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
30मार्च 2026

 

No comments:

पाठराखण ....आजची वात्रटिका.... दैनिक मराठवाडा नेता

आजची वात्रटिका ----------------------------- पाठराखण तुम्ही आम्ही काही केले नाही तरी, बायकांच्या आपल्याला नोटीशी आहेत. ज्यांचे ज्यांचे झाले ...