Friday, March 20, 2026

गुरु शिष्य लीला.....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
गुरु शिष्य लीला
तांत्रिक असोत वा मांत्रिक,
कसले तरी प्रकार सुरू लागतात.
राजकारण्यांना सदा सर्वदा,
कसले ना कसले गुरु लागतात.
गुरु शिष्यांच्या जोड्या जमल्या की,
एकमेकांची जोरात पाठराखण असते.
गुरु किंवा शिष्य चुकला तरी,
एकमेकांच्या चुकावरती झाकण असते.
राजकीय गुरु चेल्यांचा हैदोस,
फक्त एकीकडे नाही पक्षोपक्षी आहे !
फक्त वर्तमानच नाही तर,
आपला भूतकाळ याला साक्षी आहे!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9222
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
20 मार्च 2026

 

No comments:

दंभ स्फोट ..आजची वात्रटिका...दैनिक मराठवाडा नेता

आजची वात्रटिका ----------------------------- दंभ स्फोट कोण चूक कोण बरोबर? आपल्यासमोर प्रश्न उभा आहेत, याचे नेमके उत्तर सांगायचे तर, जसे भक्त...