आजची वात्रटिका
----------------------------
सहजीवन
बाबा बुवा आणि राजकारण्यांचा,
एकमेकांसाठी दुवा असतो.
म्हणूनच नेत्यांच्या आजूबाजूला,
कुठला तरी बाबा बुवा असतो.
परस्परांचे सगळे हितसंबंध,
परस्परांकडून जपले जातात !
श्रद्धेच्या आंधळ्या बाजारात,
नासके नारळही खपले जातात !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
आजची वात्रटिका - 111
वर्ष - पहिले
दैनिक मराठवाडा नेता
23मार्च 2026

No comments:
Post a Comment