Tuesday, March 24, 2026

नंगेसे खुदा डरे....आजची वात्रटिका ...दैनिक मराठवाडा नेता

आजची वात्रटिका
-----------------------------
नंगेसे खुदा डरे....
जे जे काही अत्यंत खाजगी आहे,
ते ते सार्वजनिक होऊ लागले.
व्हायरल नावाच्या टॉनिकमुळे,
सगळेच फोटोजेनिक होऊ लागले.
सोशल मीडियात व्हायरल होण्याची,
ज्याला त्याला सांसर्गिक नशा आहे !
नंगेसे खुदा डरे....
एवढी वाईट व्हायरल दशा आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
आजची वात्रटिका - 112
वर्ष - पहिले
दैनिक मराठवाडा नेता
24मार्च 2026

 

No comments:

राजकीय किडा...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- राजकीय किडा टोकरत राहतो;पोखरत राहतो, असा राजकीय किडा असतो. कधी अंतर्गत, कधी बाहेर, त्याचा राडा एके...