Sunday, March 15, 2026

राजकारण गेलं चुलीत.....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
राजकारण गेलं चुलीत
अच्छे दिन आल्याचे सांगत.
चुली घालू लागल्या फुगड्या.
सब कुछ आलबेल है...च्या,
बाता पडायला लागल्या उघड्या.
अरे संसार संसार म्हणीत,
महागाई पटवायला लागली.
टंचाईचे चटके बसतानाच,
बहिणाबाई आठवायला लागली.
अमुक चुलीवरचे,तमुक चुलीवरचे,
ही काही फक्त जाहिरातबाजी नाही !
महागाईचा हात सोडायला,
कृत्रिम टंचाई सुद्धा राजी नाही !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9217
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
15 मार्च 2026

 

No comments:

सक्ती आणि भक्ती ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------------------ सक्ती आणि भक्ती प्रत्येक भाषा वाढली पाहिजे, प्रत्येक भाषा टिकली पाहिजे. जिथे राहायचे,जिथले खाय...