Monday, March 9, 2026

आम्ही विश्वविजेते......प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
आम्ही विश्वविजेते
बॅट म्हणाली बॉलला,
तुला खणकावचं लागतंय.
क्वालिटी म्हणाली क्वांटिटीला,
आपल्याला जिंकावच लागतंय.
हाणा..मारा..ठोका...
विजयाची भारी ट्रिक ठरली आहे.
टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या,
विजयाची हॅट्ट्रिक ठरली आहे.
जो जिता वही सिकंदर,
हीच विजयाची धारणा आहे !!
उद्याच्या अनेक पिढ्यांसाठी,
आणखी एक प्रेरणा आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9211
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
9 मार्च 2026

 

No comments:

षडयंत्र....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- षडयंत्र शांतता आणि सुव्यवस्थेला सगळीकडूनच धक्का आहे. साध्या साध्या प्रकरणांवरही, जाती धर्माचा शि...