आजची वात्रटिका
----------------------------
साहित्य संमेलन फंडा
कधी वाटते मोठ्यांसाठी असते,
कधी वाटते छोट्यांसाठी असते.
वास्तवात कोणतीही साहित्य संमेलन,
साहित्यिकांच्या साट्या लोट्यासाठी असते.
आपली हौस पुरवून घेतली जाते,
आपली हौस मिरवून घेतली जाते.
मी तुला बोलावतो,तुम्ही मला बोलवा,
अशी सुपारीही ठरवून घेतली जाते.
ऑनलाइन आणि ऑफलाइन,
साहित्य संमेलनांचा सारखाच फंडा आहे!
सच्चा साहित्य रसिकांना मात्र,
संमेलना - संमेलनामधून गंडा आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9226
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
24मार्च 2026
----------------------------

No comments:
Post a Comment