Tuesday, March 17, 2026

सुपारी....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
सुपारी
कुणी म्हणे आरोप,
कुणी म्हणे फपारी आहे.
पुन्हा एकदा चर्चेमध्ये,
राजकीय सुपारी आहे.
खूप मोठा फरक,
सत्य असत्यात आहे.
सुपारीच्या आरोपांमुळे,
कुणी अडकित्त्यात आहे.
दिल्या घेतल्या सुपारीची,
मोठी वाजवा वाजवी आहे !
ज्याला ज्याला येतो कंड,
त्याची खाजवा खाजवी आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9219
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
17 मार्च 2026

 

No comments:

षडयंत्र....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- षडयंत्र शांतता आणि सुव्यवस्थेला सगळीकडूनच धक्का आहे. साध्या साध्या प्रकरणांवरही, जाती धर्माचा शि...