Sunday, March 8, 2026

टी ट्वेंटी वर्ल्ड कपचे भविष्य....आजची वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------------
टी ट्वेंटी वर्ल्ड कपचे
भविष्य
कुठे बोलू लागले पोपट,
कुठे कुठे बाबा वेंगा आहे.
सगळ्यांच्याच भविष्याला,
क्रिकेटकडून ठेंगा आहे.
कुणी मांडल्या कुंडल्या,
कुणी पत्ते पिसत आहेत !
बॅट म्हणाली बॉलला,
आपले स्टार हसत आहेत!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
आजची वात्रटिका - 99
वर्ष - पहिले
दैनिक मराठवाडा नेता
8 मार्च 2026

 

No comments:

मोर्चाचे पीक...साप्ताहिक वात्रटिका

साप्ताहिक  वात्रटिका  -------------------------------- मोर्चाचे पीक जणू शेतकऱ्यांच्या हितावरती,  सगळ्यांचेच राजकीय जीव आहेत.  त्...