Thursday, March 26, 2026

विळखा....आजची वात्रटिका ....दैनिक मराठवाडा नेता

आजची वात्रटिका
-----------------------------
विळखा
अन्याय आणि अत्याचाराचे प्रकार,
अगदी गुपचूपपणे सोसले जातात.
समाजाच्या सहनशीलतेमुळेच,
भोंदू बुवा बाबा पोसले जातात.
गरजवंताला कधीच अक्कल नसते,
याचाच हा ढळढळीत दाखला आहे !
यामुळेच पुरोगामी महाराष्ट्राला,
बुवा बाबांनी विळखा टाकला आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
आजची वात्रटिका - 114
वर्ष - पहिले
दैनिक मराठवाडा नेता
26मार्च 2026

 

No comments:

राजकीय किडा...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- राजकीय किडा टोकरत राहतो;पोखरत राहतो, असा राजकीय किडा असतो. कधी अंतर्गत, कधी बाहेर, त्याचा राडा एके...