Thursday, July 13, 2023

सुज्ञास सांगणे न लगे...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

सुज्ञास सांगणे न लगे...

वाट्टेल त्याला;वाट्टेल तसे,
गुळाचे गणपती पावायला लागले.
उरले सुरले भक्तही मग,
नवसासाठी धावायला लागले.

काही भक्त हौसाचे आहेत,
काही भक्त नवसाचे आहेत.
जसे हे गणपती गुळाचे आहेत,
तसेच ते दीड दिवसाचे आहेत.

दीड दिसात; कोल्हं उसात,
नावडतीचे मीठ आळणी आहे !
कुणाला तोंड दाबून बुक्क्यांचा मार,
कुणाची सोयीस्कर गुळणी आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
चिमटा-6861
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
13जुलै2023
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...