Wednesday, July 5, 2023

पॉवर गेम 2....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

पॉवर गेम 2

शिवसेना काय ? राष्ट्रवादी काय?
सगळेच पॉलिटिक्स इक्वल आहे.
दुसरे तिसरे काहीच नाही,
हा तर 'पॉवर गेम'चा सिक्वल आहे.

आजचा प्रोड्यूसरसुद्धा तोच आहे,
आजचा डिरेक्टरसुद्धा तोच आहे.
फक्त हिरो बदलला असला तरी,
आजचा फायनान्सरसुद्धा तोच आहे.

आजचे लोकेशन चेंज असले तरी,
कॉमेडीचाही तोच तडका आहे !
क्लायमॅक्सची उत्सुकता असली तरी,
जळफाटाचाही तोच भडका आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------
चिमटा-6853
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
5जुलै2023
 

No comments:

फूट आणि विलीनीकरण...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- फूट आणि विलीनीकरण फुटीनंतर विलीनीकरण असते, विलीनीकरणानंतर फूट असते. तरीही दिल्लीपासून गल्लीपर्यंत,...