Tuesday, July 4, 2023

वन नेशन,वन पार्टी...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

वन नेशन,वन पार्टी

नऊ वर्ष; नऊ राज्ये फोडून झाली,
जी पाहिजे ती पार्टी तोडून झाली.
गळाला लागले अलगद मासे,
इंजिनाला इंजिनेही जोडून झाली.

कुणी कितीही म्हणू शकतो,
हे जेवढे विध्वंसक तेवढेच डर्टी आहे !!
वरवर 'ऑपरेशन लोटस' तरी,
आतून मात्र 'वन नेशन वन पार्टी' आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------------
चिमटा-6852
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
4जुलै2023
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...