आजची वात्रटिका
-------------------------
चौकशी समिती
लाथाळ्या आणि वेळकाढूपणा,
हे चौकशी समितीचे जनक असतात.
मुदतवाढ आणि पुनर्रचना,
हे चौकशी समितीचे मानक असतात.
चौकशी समिती स्थापण्यामागचे,
कारणही बेरकी आणि धोरणी असते.
विरोधकांनी बोंबाबोब केली तरी,
समितीवर बगलबच्च्यांची वर्णी असते.
समिती मागे समिती जन्माला येते,
समितीला नको तेवढे फाटे असतात.
जसे बरेच अहवाल फिक्स,
तसे बरेच अहवाल वांझोटे असतात.
प्रकरण कितीही नवे असले तरी,
पुन्हा जुनीच मळवाट धुंडाळली जाते !
एकदा प्रकरण विस्मृतीत गेले की,
चौकशी समितीही गुंडाळली जाते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------
चिमटा-6873
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
25जुलै2023

No comments:
Post a Comment