Saturday, July 8, 2023

षंढोबांनो....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

षंढोबांनो...

भारतीय लोकशाहीचा,
सगळा खेळखंडोबा आहे.
गुंडोबा - पुंडोबा सोबत,
बंडोबा एके बंडोबा आहे.

पक्षा - पक्षातील गंडोबा,
बंडोबा म्हणून मिरवू लागले.
बंडालाच उठाव म्हणीत,
आपला कंडोबा जिरवू लागले.

बंडोबामागे मेंढोबा उभे,
मेंढोबामागे झेंडोबा आहे !
आंडोबा - पांडोबा शेफारले,
कारण आपला थंडोबा आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
चिमटा-6856
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
8जुलै2023
 

No comments:

daily vatratika...3april2025