Monday, July 31, 2023

प्रेरणा आणि धारणा...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

प्रेरणा आणि धारणा

एखाद्याच्या फायद्यासाठी,
दुसऱ्याला बदनाम करणे बरे नाही.
प्रेरणेच्या नावाखाली,
कुणाला नाउमेद करणे खरे नाही.

प्रेरणा ही प्रेरणाच असावी,
कुणाची कसोटी वा परीक्षा बघू नये.
माया गायीची दाखवून,
करणी मात्र कसायाची निघू नये.

शंका आणि कुशंकांचे प्रश्न,
पत्रिके पत्रिकेवर छापील आहेत !
असा मात्र गैरसमज नको,
शांत आहेत म्हणजे गाफील आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8316
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
31जुलै जून2023
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...