Sunday, July 2, 2023

राजकीय शब्दकोश....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

राजकीय शब्दकोश

राजकारणाचे दुष्परिणाम,
जे व्हायचे तेच झाले आहेत.
देवेंद्रवासी आणि शरदवासी,
नवे शब्द जन्मास आले आहेत.

जुने शब्द गुळगुळीत झाले,
म्हणून नव्या शब्दांचा शोध आहे.
त्यांच्यापेक्षा लोकांना,
यातून जो व्हायचा तो बोध आहे.

असल्या नव्या नव्या शब्दांनी,
एकमेकांची झोप उडू शकते !
यापुढे राजकीय शब्दकोशात,
नव्या शब्दांची भर पडू शकते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8292
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
2जुलै जून2023
 

No comments:

दैनिक वात्रटिका9मे2024....वर्ष- तिसरे..अंक -337 वा

दैनिक वात्रटिका 9मे2024....वर्ष- तिसरे.. अंक -337 वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1YKcJAplgFQ_Yy4Y-iGAd4-zID...