Thursday, July 20, 2023

जाहिरातीचा जुगार....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------
जाहिरातीचा जुगार
याची मुळीच खंत नाही,
सचिन एखादी जाहिरात करतो आहे.
प्रश्न तेव्हा निर्माण होतो,
तो जेव्हा जुगाराची बात करतो आहे.
आपणही हेही समजू शकतो,
जाहिरातीशिवाय त्याचे निभत नाही.
पण भारतरत्न नावाच्या सचिनला,
हे कृत्य अजिबातच शोभत नाही.
फक्त जाहिरातीतल्या पैशासाठीच,
त्याचा सगळा आटापिटा आहे !
याचा अर्थ एवढाच निघू शकतो,
भारतरत्नापेक्षाही पैसा मोठा आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
चिमटा-6867
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
20जुलै2023
-----------------------------------

No comments:

बोलून चालून ते गिबली आहे ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- बोलून चालून ते गिबली आहे सगळी दुनिया गिबली फोटोसाठी, फोटोसाठी राब राब राबली आहे. लोकांनी दिले काय? आले का...