Saturday, July 1, 2023

दूध आणि ताक....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------
दूध आणि ताक
एकदा दूध पोळले की,
ताकही फुंकून प्यावे लागते.
पोळविणारा पोळवून जातो,
दुसऱ्यालाच फुंकून घ्यावे लागते.
ज्याच्याकडून पोळले गेले,
तो ताकास तूरही लागू देत नाही.
तो दुधाची तहान सुद्धा,
तो ताकावरती भागू देत नाही.
त्यामुळे ताकाला जाऊन सुद्धा,
आपलेच भांडे लपवावे लागते !
भेसळीचे दूधसुद्धा,
संधी दिसताच खपवावे लागते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------
फेरफटका-8291
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
1जुलै2023

 

No comments:

दैनिक वात्रटिका9मे2024....वर्ष- तिसरे..अंक -337 वा

दैनिक वात्रटिका 9मे2024....वर्ष- तिसरे.. अंक -337 वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1YKcJAplgFQ_Yy4Y-iGAd4-zID...