Monday, July 31, 2023

किडेशास्त्र....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

 आजची वात्रटिका

-------------------------
किडेशास्त्र
कुणाच्या पोटात किडे असतात,
कुणाच्या डोक्यात किडे असतात.
जसे कुणाच्या मागे किडे असतात,
तसे किडे कुणाच्या पुढे असतात.
जेव्हा पोटातले आणि डोक्यातले,
किडे जरा जास्तच वळवळू लागतात.
तेव्हा कुणाच्या कुठे कुठे किडे आहेत ?
ते अगदी ठळकपणे कळू लागतात.
डोक्यात असोत वा आणखी कुठे,
किडे मग गैरफायदा घेऊ लागतात !
प्रश्न तेव्हा बिकट होऊ लागतो,
जेव्हा किडे ओठावर येऊ लागतात !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
चिमटा-6879
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
31जुलै2023

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...