Sunday, July 9, 2023

काल महात्म्य....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

काल महात्म्य

राजकारणाचे फासे,
उलटे सुलटे पाडले जातात.
जे निरोपयोगी आहेत,
ते निकालात काढले जातात.

कालचे चलनी नाणेही,
आज जेंव्हा चालत नाही.
तेव्हा आपलीच प्रतिमा,
आपल्यालाही पेलत नाही.

ना उरते उपयोगिता मूल्य,
ना उपद्रवमूल्यही कामी येते !
आपल्याच कर्तृत्वाची मग,
आपल्याकडूनच बदनामी होते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8298
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
9जुलै जून2023
 

No comments:

नेत्यांचे मित्र प्रेम...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- नेत्यांचे मित्र प्रेम राजकीय नेत्यांच्या मित्रांवरती, लोक उगीचच दात खात असतात. ते पुंडलिका वर दे...चा गजर...