आजची वात्रटिका
-------------------------
तुलनात्मक विचार
पक्षांतर्गत बंडाच्या धक्क्याने,
राजकीय धुरंदरही जाम होतात.
हकनाक बदनाम होतो विठ्ठल,
हकनाक बडवेही बदनाम होतात.
दोघांच्या राजकीय भांडणांमध्ये,
तिसऱ्याचा विनाकारण तोटा आहे.
कुणास विठ्ठल आणि बडवे म्हणणे,
तुलनेचा प्रकारच तसा खोटा आहे.
उपमा हा अलंकार असला तरी,
कधी कधी विद्रूपीकरण होत जाते !
ज्याचे जळते त्यालाच कळते,
ज्याची त्यालाच प्रचिती येत जाते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------------
चिमटा-6855
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
7जुलै2023

No comments:
Post a Comment