Monday, July 10, 2023

छिनाल-की....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

छिनाल-की

हेही छिनाल झाले;तेही छिनाल झाले,
अजून सांगा काय होणे बाकी आहे ?
जणू राजकीय छिनालकी हीच,
राजकीय प्रगतीची 'मास्टर की' आहे.

छिनालकीच्या मास्टर चावीने,
सत्तेचे दरवाजे सहज उघडू लागले.
असंगाशी संग होत होत,
राजकीय चारित्र्यच बिघडू लागले.

ढवळ्या शेजारी पवळ्या गेला,
त्याला त्याचा गुण आणि वाण आहे !
बाजारबसव्यांत छिनाकीचा उपाय,
अगदी जालीम आणि रामबाण आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8299
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
10जुलै जून2023
 

No comments:

बोलून चालून ते गिबली आहे ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- बोलून चालून ते गिबली आहे सगळी दुनिया गिबली फोटोसाठी, फोटोसाठी राब राब राबली आहे. लोकांनी दिले काय? आले का...