Friday, July 7, 2023

पक्षाघाताचे झटके...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

पक्षाघाताचे झटके

सर्वच राजकीय पक्षातील बंडखोर,
मूळ पक्षालाच मात देऊ लागले.
रोज नव्या नव्या राजकीय पक्षाला,
त्यामुळेच पक्षाघात होऊ लागलं.

आपल्या आणि इतरांच्याही पक्षाला,
पक्षाघाताचे जोरात झटके आहेत.
इकडच्या आणि तिकडच्याही
बंडखोरांमध्ये जोरात खटके आहेत.

झटक्यांनी आणि खटक्यांनीच,
आजचे राजकारण त्रस्त आहे !
निष्ठावंतांपेक्षा बंडखोरांचेच,
अस्थिर राजकारणात प्रस्थ आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8297
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
7जुलै जून2023
 

No comments:

यंत्र मंत्र आणि तंत्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------------- यंत्र मंत्र आणि तंत्र यंत्र,तंत्र आणि मंत्रांचा, निवडणुकीत वापर आहे. नाहीच मिळाले यश तर, मतदान ...