Thursday, July 27, 2023

आवाज कुणाचा?...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

आवाज कुणाचा?

त्यांचीच मुलाखत आहे,
त्यांचाच मुलाखतकार आहे.
आपलेच प्रश्न;आपलीच उत्तरं,
हेच 'पॉडकास्ट'चे सार आहे.

जुन्याच मॅरेथॉन मुलाखतीचा,
जणू हा नवा अवतार आहे.
आवाज कुणाचा ?
हा प्रश्नच तसा मजेदार आहे.

त्यांचे प्रश्नही रोकडे आहेत,
त्यांचे उत्तरंही रोकडे आहेत!
आपणच शोधाशोध करायची,
नेमके कुठे कुठे खेकडे आहेत?

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
चिमटा-6875
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
27जुलै2023
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...