Sunday, July 30, 2023

भारत-पाक संबंध...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

भारत-पाक संबंध

पूर्वी फक्त घुसखोऱ्या गाजायच्या,
आता लव्ह स्टोऱ्या गाजत आहेत.
गाजलेल्या लव्हस्टोऱ्यातूनही म्हणे,
पुन्हा कटकारस्थानेच शिजत आहेत.

प्रेमासाठी वाट्टेल ते म्हणीत,
प्रेमवेड्यांची आवक जावक आहे.
बॉर्डर - बिर्डर गळून पडल्या,
प्रेम हाच देव,प्रेम हेच देवक आहे.

ऑनलाइन प्रेमाच्या खेळात,
कुणाचा मेंदू आणि खिसाही साफ आहे !
कुढत रहा....लढत रहा,
प्रेमात आणि युद्धात सगळे माफ आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
चिमटा-6878
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
30जुलै2023
 

No comments:

नेत्यांचे मित्र प्रेम...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- नेत्यांचे मित्र प्रेम राजकीय नेत्यांच्या मित्रांवरती, लोक उगीचच दात खात असतात. ते पुंडलिका वर दे...चा गजर...