Monday, July 17, 2023

घालीन लोटांगण....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------
घालीन लोटांगण....
आधी तावा-तावात शक्ती प्रदर्शन झाले,
मग भावा-भावात भक्ती प्रदर्शन केले.
गावा-गावात हाकारे आणि पुकारे देत,
कार्यकर्त्यांवर चक्क सक्ती प्रदर्शन केले.
शक्ती भक्ती आणि सक्तीनंतर,
आता युक्तीच्या गोष्टीची अपेक्षा आहे.
ज्यांच्या वयाची आणि अनुभवाची,
अगदी छाती ठोकपणे उपेक्षा आहे.
भक्ती-शक्ती;सक्ती-युक्तीच्या गोष्टीमुळे,
शंका-कुशंकांना मोकळे पटांगण आहे !
बडवे हटाव..बडवे हटाव चा नारा देत,
भक्तांचे विठ्ठलासमोर लोटांगण आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8304
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
17जुलै जून2023

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...