Wednesday, July 26, 2023

चार दिवसाचा पावसाळा...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

चार दिवसाचा पावसाळा

कधी कधी कोसळतो धो धो,
एरव्ही पावसाळाच बॅन आहे.
आजकाल जणू पाऊसही,
ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेटचा फॅन आहे.

वाढत्या ग्लोबल वॉर्मिंगची,
पावसाकडून वॉर्निंग बेल आहे.
हवामान तज्ञापासून वेधशाळेपर्यंत,
हल्ली प्रत्येक जणच फेल आहे.

हल्ली चार दिवसाचा पावसाळा,
बाकी सगळाच तर उन्हाळा आहे!
धाबे दणाणल्याची चाहूल,
प्रत्येक पन्हाळा पन्हाळा आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
दैनिक वात्रटिका
वर्ष -3रे
26जुलै जून2023
 

No comments:

नेत्यांचे मित्र प्रेम...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- नेत्यांचे मित्र प्रेम राजकीय नेत्यांच्या मित्रांवरती, लोक उगीचच दात खात असतात. ते पुंडलिका वर दे...चा गजर...