आजची वात्रटिका
-------------------------
बदनामीचा ताळेबंद
नेत्यामुळे राजकारण बदनाम झाले.
राजकारणामुळे सत्ताकारण,
सत्ताकारणमुळेच हे सारे काम झाले.
ज्याला त्याला एकमेकांना,
बदनाम करण्याचीच घाई आहे.
बदनामीच्या या संघर्षामध्ये,
खरी बदनाम तर लोकशाही आहे.
लोकशाहीच्या बदनामीच्या हिशोबाचा
थांगपत्ताही लागूच शकत नाही !
लोकशाही आपल्या बदनामीची,
नुकसान भरपाईही मागूच शकत नाही !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------------
चिमटा-6857
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
9जुलै2023

No comments:
Post a Comment