Wednesday, July 12, 2023

कलंकशोभा...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

कलंकशोभा

बोलताना आपल्या जिभेची हौस,
ते जशी वाट्टेल तशी पुरवू लागले.
जे ते आपापले कलंकच,
आपली शोभा म्हणून मिरवू लागले.

बोलताना कशाचीच कशाला,
शोधून दाखवा कुठे लिंक आहे ?
ते जे मारतात एकमेकांना डंख,
तोच सगळ्यात मोठा कलंक आहे.

आपल्या निष्कलंकपणाचे,
सगळ्यांचेच जोरदार दावे आहेत!
त्यांच्या कलंकाचे ठाव ठिकाणे,
लोकांना मात्र पक्के ठावे आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------
चिमटा-6860
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
12जुलै2023
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...