Saturday, July 29, 2023

भेकडांचा धर्म...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

भेकडांचा धर्म

भेकडांना घाबरवले की,
एकत्र सारे भेकड होतात.
केलेल्या इशाऱ्यावर नाचणारे,
सारे भेकड माकड होतात.

भेकडांची आणि मूर्खांची,
सर्वात लवकर एकी होते.
हम सब एक है..
नारेबाजी आणि शेखी होते.

भित्यापोटी ब्रह्मराक्षस,
अगदीच ठरलेला असतो !
भेकडांच्या हाती मग,
पळवाटांचा मार्ग उरलेला असतो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8314
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
29जुलै जून2023
 

No comments:

daily vatratika...29jane2026