Tuesday, July 18, 2023

सावळा गोंधळ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

सावळा गोंधळ

लोकशाहीच्या सभागृहापुढे,
आता नवीनच पेच आहेत.
जे पक्ष विरोधात आहेत,
सत्ताधारी पक्षही तेच आहेत.

लोकशाहीचेही शहाणपण,
हल्ली सत्तेपुढे चालत नाही.
आपलेच उदार धोरण,
हल्ली लोकशालाही पेलत नाही.

उदार लोकशाहीच्या हातावर,
कोहळा घेऊन आवळा आहे !
गाढवापुढे गीता वाचली तरी,
आजचा गोंधळ सावळा आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8305
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
18जुलै जून2023
 

No comments:

सोशल स्टेटस ......प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- सोशल स्टेटस आजच्यासारखा राजकीय स्वार्थ, आम्ही यापूर्वी कधीच पाहिला नाही. शुभेच्छासारख्या शुभेच्छांनासुद्...