Wednesday, July 26, 2023

जागृत सोंगाडे..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

जागृत सोंगाडे

कधी कधी गाढ झोपलेले लोकही,
जागेपणाचे सोंग करू लागतात.
दुनियाच सोंगा ढोंगाची असल्याने,
तेही जागेपणाचे ढोंग करू लागतात.

जागेपणाचा आव आणला तरी,
लोक डुलक्या देत देत पेंगत असतात.
सगळे काही कळून वळूनही,
तान्ह्या बाळासारखे रांगत असतात.

जसे झोपेचे सोंग घेतलेल्यांना,
कधीच जागे करता येत नाही !
तसे जागेपणाचे सोंग घेतलेल्यांनाही,
अजिबातच गृहीत धरता येत नाही !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
चिमटा-6874
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
26जुलै2023
 

No comments:

daily vatratika...29jane2026