Thursday, October 31, 2019

ठकास महाठक


भिंगुरभिवरे



आजची वात्रटिका
--------------------------------------
भिंगुरभिवरे
राजकीय गद्दारीचे धडे
पुन्हा पुन्हा गिरवले जातात.
परस्परांना दिलेले शब्द,
भिंगरीसारखे फिरवले जातात.
सत्तेसाठी हेही हावरे असतात,
सत्तेसाठी तेही हावरे असतात !
शब्दांची फिरवाफिरवी करणारे,
अट्टल भिंगुरभिवरे असतात !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7108
दैनिक झुंजार नेता
31ऑक्टोबर2019
--------------------------------------------
वाचा आणि इतरांनाही शेअर करा.
माझ्या दैनिक पुण्यनगरीतील
'चिमटा'
आणि दैनिक झुंजार नेता तील
'फेरफटका'
या सदरातील सतरा हजारांपैकी,
सहा हजारांहून जास्त निवडक
वात्रटिका
वाचण्यासाठी आणि इतरांना
शेअर करण्यासाठी क्लिक करा.
उर्वरीत
https://suryakantdolase.blogspot.in
-------------------------
#आजच्या_वात्रटिका

Wednesday, October 30, 2019

दीवाळी२०१९


पावसाचा सदुपयोग

आजची वात्रटिका
--------------------------------------
पावसाचा सदुपयोग
नेमके साधले टायमिंग,
पाऊस आला धावून.
अति आत्मविश्वास
पावसात गेला वाहून.
धोबीपछाड टाकून,
पाणी पाजावे लागते !
मतदान वाढण्यासाठी
पावसात भिजावे लागते !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7107
दैनिक झुंजार नेता
28ऑक्टोबर2019
----------------------------------------
चिमटा-5611
दैनिक पुण्यनगरी
28ऑक्टोबर2019

Monday, October 28, 2019

विधानसभा२०१९

आजची वात्रटिका
--------------------------------------
विधानसभा२०१९
मनसेच्या इंजिनाला
एकच डबा आहे.
आपले संचित समजून
वंचित उभा आहे.
बेचैन दोन्ही काँग्रेस,
भाजपा अस्वस्थ आहे.
खाते उघडल्याने,
एम.आय.एम मस्त आहे.
इतर लिंबू टिंबूचे,
जेम तेम वजन आहे !
' मातोश्री ' च्या आशीर्वादाने
सेनेचे ' आदित्य पूजन ' आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5611
दैनिक पुण्यनगरी
28ऑक्टोबर2019

Sunday, October 27, 2019

सूक्ष्म निरीक्षण

आजची वात्रटिका
-------------------------------------
सूक्ष्म निरीक्षण
ते हारतात,तेच जिंकतात,
आपण टाळ्या पिटत असतो.
त्यांचा विजय किंवा पराभव,
आपल्याला आपला वाटत असतो.
आमचे हे फक्त निरीक्षण नाही,
आमचे हे गाऱ्हाणे असते !
जिंकलेल्या आणि हारलेल्यांचे,
नेहमी एकच घराणे असते !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7106
दैनिक झुंजार नेता
27ऑक्टोबर2019

उलटी गंगा

आजची वात्रटिका
-------------------------------------

उलटी गंगा

फार मोठी अपेक्षा नव्हती,
जे झाले तेच गोड आहे.
विरोधी बाकावर बसायची,
पक्षा - पक्षात ओढ आहे.

साधे सरळ काहीच नाही,
ही तर उलटी गंगा आहे !
सत्ताधारी कोड्यात,
विरोधकांचा मात्र दंगा आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5610
दैनिक पुण्यनगरी
27ऑक्टोबर2019
--------------------------------------------

वाचा आणि इतरांनाही शेअर करा.
माझ्या दैनिक पुण्यनगरीतील
'चिमटा'
आणि दैनिक झुंजार नेता तील
'फेरफटका'
या सदरातील सतरा हजारांपैकी,
सहा हजारांहून जास्त निवडक
वात्रटिका
वाचण्यासाठी आणि इतरांना
शेअर करण्यासाठी क्लिक करा.
उर्वरीत
https://suryakantdolase.blogspot.in
-------------------------
#आजच्या_वात्रटिका

Saturday, October 26, 2019

भास आभास

आजची वात्रटिका
-------------------------------------
भास आभास
शुभेच्छा वर शुभेच्छा,
जणू शुभेच्छांचे गुऱ्हाळ आहे.
व्हरच्युअल शुभेच्छा,
व्हरच्युअल फराळ आहे.
सणांच्या शुभेच्छा बरोबर,
जगणेही व्हरच्युअल झाले आहे !
माणसे चालली दूर,
जग मात्र जवळ आले आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7105
दैनिक झुंजार नेता
26ऑक्टोबर2019

निकालानंतर

आजची वात्रटिका
-------------------------------------
निकालानंतर
कुणी काजळून निघाले,
कुणी उजळून निघाले.
ईव्हीएम मात्र,
आयतेच उजळून निघाले.
कुणाला स्वतःबरोबर,
ईव्हीएम चाही राग आहे !
म्हणे ईव्हीएम च्या खात्रीसाठी,
हा राजकीय कटाचा भाग आहे !
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5609
दैनिक पुण्यनगरी
26ऑक्टोबर2019

Friday, October 25, 2019

नाते आणि गोते

आजची वात्रटिका
-------------------------------------
नाते आणि गोते
कुठे हारले,कुठे जिंकले,
पुतणे आणि काका.
रक्ताच्या नात्या - गोत्याला,
राजकारणाचा धोका.
नात्या - गोत्याचे संबंध
राजकारणामुळे गोत्यात आहेत !
सुपातल्यांनी बघून घ्यावे,
कोण कोण आज जात्यात आहेत ?
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7104
दैनिक झुंजार नेता
25ऑक्टोबर2019

उतावळेपणा

आजची वात्रटिका
-------------------------------------
उतावळेपणा
टीव्ही चॅनेलवाल्यांच्याही पुढे,
नेते एक पाऊल वागू शकतात.
म्हणून निवणूक निकालाआधीच
विजयाचे बॅनर लागू शकतात.
नेत्यांचा असतो जल्लोष,
कार्यकर्त्यांचे डांगडींग असते !
उतावळ्या कलवऱ्यांचेच,
गुडघ्याला बाशिंग असते !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7106
दैनिक झुंजार नेता
24ऑक्टोबर2019

आमचा एक्झिट पोल

आजची वात्रटिका
-------------------------------------
आमचा एक्झिट पोल
निवडणूकीच्या निकालामुळे
राजकारणावर पडदे पडले.
अनेक सभ्य गोष्टींचे,
निवडणूकीत मुडदे पडले.
कुणी हारुनही जिंकले आहेत,
कुणी जिंकूनही हारले आहेत !
कुठे लोकशाहीचे पराभव,
शाप म्हणून पेरले आहेत !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5608
दैनिक पुण्यनगरी
25ऑक्टोबर2019

Thursday, October 24, 2019

निकालापूर्वीचा निकाल

आजची वात्रटिका
-------------------------------------
निकालापूर्वीचा निकाल
आरोप - प्रत्यारोपांचा कार्यक्रम
नको तेवढा बकाल असतो.
मतमोजणीच्या पूर्वीच,
बऱ्याच गोष्टींचा निकाल असतो.
नाती - गोती,निष्ठा - बिष्ठा,
यांची सगळी माती होते.
याचा अर्थ असा नाही की,
कुणा एकाचेच अती होते.
कुणी हारणार,कुणी जिंकणार,
हे सत्य तर त्रिकाल आहे !
सगळी वाट लागल्यावर कळते,
राजकारण फक्त गलिच्छ नाही,
ते नको तेवढे बकाल आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5607
दैनिक पुण्यनगरी
24ऑक्टोबर2019

Wednesday, October 23, 2019

प्रीतीचा पाऊस

आजची वात्रटिका
-------------------------------------
प्रीतीचा पाऊस
आपल्याला प्रिय असो वा नसो,
तो पाऊस परतीचा असतो.
आपण निव्वळ निमताळे,
तो प्रियकर धरतीचा असतो.
आपण नेहमीच चिडचिडे,
कळत नाही पाऊस का रमला आहे?
पावसाला यावेच लागते,
शेवटी त्याच्या प्रीतीचा मामला आहे !
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5606
दैनिक पुण्यनगरी
23ऑक्टोबर2019

पावसाचा दुस्वास

आजची वात्रटिका
-------------------------------------
पावसाचा दुस्वास
उजव्या असणाऱ्या गोष्टी,
एकाएकी डाव्या झाल्या.
कालच्या ओव्या,
आज आचानक शिव्या झाल्या.
हव्याहव्याशा पावसाचा
आता दुस्वास घडतो आहे !
काल डोळे वटारणारा,
आज पेताडा सारखा पडतो आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7102
दैनिक झुंजार नेता
23ऑक्टोबर2019

Tuesday, October 22, 2019

भावार्थ दामायण



आजची वात्रटिका
-------------------------------------
भावार्थ दामायण
कधी भाव केला जातो,
कधी भाव करवून घेतात.
जेवढे भावूक,तेवढे घाऊक,
आपला भाव ठरवून घेतात.
भावार्थ दामायण
निवडणुकीत रंगत असते !
पुढचीला मागची निवडणूक,
आपला रूबाब सांगत असते !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7100
दैनिक झुंजार नेता
21ऑक्टोबर2019
-----------------------------
वाचा आणि इतरांनाही शेअर करा.
माझ्या दैनिक पुण्यनगरीतील
'चिमटा'
आणि दैनिक झुंजार नेता तील
'फेरफटका'
या सदरातील सतरा हजारांपैकी,
सहा हजारांहून जास्त निवडक
वात्रटिका
वाचण्यासाठी आणि इतरांना
शेअर करण्यासाठी क्लिक करा.
उर्वरीत
https://suryakantdolase.blogspot.in
-------------------------
#आजच्या_वात्रटिका

आंबट चिंबट



आजची वात्रटिका
-------------------------------------
आंबट चिंबट
आंबट चिंबट वासाला
ईव्हीएम आंबली आहे.
आंबट चिंबट चव
ईव्हीएम ला झोंबली आहे.
ईव्हीएम प्रमाणे समर्थकांचे
चेहरेही लांबट आहेत !
नाही तरी भुकेल्या कोल्ह्याला
द्राक्षे आंबट आहेत !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7101
दैनिक झुंजार नेता
22ऑक्टोबर2019
-----------------------------
वाचा आणि इतरांनाही शेअर करा.
माझ्या दैनिक पुण्यनगरीतील
'चिमटा'
आणि दैनिक झुंजार नेता तील
'फेरफटका'
या सदरातील सतरा हजारांपैकी,
सहा हजारांहून जास्त निवडक
वात्रटिका
वाचण्यासाठी आणि इतरांना
शेअर करण्यासाठी क्लिक करा.
उर्वरीत
https://suryakantdolase.blogspot.in
-------------------------
#आजच्या_वात्रटिका

सौदेशाही



आजची वात्रटिका
-------------------------------------
सौदेशाही
देणारा देत जातो,
घेणारा घेत जातो
ज्याच्या त्याच्या किंमतीचा
सौदा होत जातो.
खरेदी विक्री वाढताच
लोकशाही स्वस्त वाटू लागते !
अब्राहम लिंकनची व्याख्या,
अगदीच रास्त वाटू लागते !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5604
दैनिक पुण्यनगरी
21ऑक्टोबर2019
-----------------------------
वाचा आणि इतरांनाही शेअर करा.
माझ्या दैनिक पुण्यनगरीतील
'चिमटा'
आणि दैनिक झुंजार नेता तील
'फेरफटका'
या सदरातील सतरा हजारांपैकी,
सहा हजारांहून जास्त निवडक
वात्रटिका
वाचण्यासाठी आणि इतरांना
शेअर करण्यासाठी क्लिक करा.
उर्वरीत
https://suryakantdolase.blogspot.in
-------------------------
#आजच्या_वात्रटिका

ईव्हीएम ची खंत



आजची वात्रटिका
-------------------------------------
ईव्हीएम ची खंत
ईव्हीएम म्हणाली,
मी हॅक नाही पॅक होते.
मतदारांची तारांबळ बघून,
माझे डोके क्रॅक होते.
लोकशिक्षण आणि प्रबोधन
यांची कुठे हमी आहे?
मतदार जागृतीची
अजून खूप कमी आहे!!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5605
दैनिक पुण्यनगरी
22ऑक्टोबर2019
-----------------------------
वाचा आणि इतरांनाही शेअर करा.
माझ्या दैनिक पुण्यनगरीतील
'चिमटा'
आणि दैनिक झुंजार नेता तील
'फेरफटका'
या सदरातील सतरा हजारांपैकी,
सहा हजारांहून जास्त निवडक
वात्रटिका
वाचण्यासाठी आणि इतरांना
शेअर करण्यासाठी क्लिक करा.
उर्वरीत
https://suryakantdolase.blogspot.in
-------------------------
#आजच्या_वात्रटिका

Saturday, October 19, 2019

विरोधकांचा हात



विरोधकांचा हात
सवयीप्रमाणे राजकारणी
विरोधकांवर घसरत असतात.
आपण काय बोलतोय?
हेसुद्धा विसरत असतात.
दौऱ्यारून आलेल्या नेत्याला
कार्यकर्ता म्हणाला,
साहेब तुम्हांला बाळ झाल्याचे
तुम्हास ज्ञात आहे?
तेंव्हा सवयीप्रमाणे नेता म्हणाला,
त्यातही विरोधकांचा हात आहे !
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------------
टोपीवर टोपी
दैनिक लोकप्रश्न
22ऑक्टोबर2002
--------------------------------------
वाचा आणि इतरांनाही शेअर करा.
माझ्या दैनिक पुण्यनगरीतील
'चिमटा'
आणि दैनिक झुंजार नेता तील
'फेरफटका'
या सदरातील सतरा हजारांपैकी,
सहा हजारांहून जास्त निवडक
वात्रटिका
वाचण्यासाठी आणि इतरांना
शेअर करण्यासाठी क्लिक करा.
उर्वरीत
https://suryakantdolase.blogspot.in
-------------------------
#आजच्या_वात्रटिका

Friday, October 18, 2019

राजकीय कुस्त्या

आजची वात्रटिका
-------------------------------------
राजकीय कुस्त्या
कुस्ती आणि मस्तीची
अंगभूत दोस्ती आहे.
प्रत्येकवेळी तोच जिंकत नाही,
ज्याची ताकद जास्ती आहे.
निवडणुका म्हणजेही
कुस्त्यांचाच फड असतो !
ज्याला तेल लावता येते,
तोच इथे वरचढ असतो !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7098
दैनिक झुंजार नेता
19ऑक्टोबर2019
----------------------------------------
वाचा आणि इतरांनाही शेअर करा.

रूप- कुरूप

रूप- कुरूप
निवडणुकीत लोकशाहीवर,
बघा कसला वक्त आहे?
जसा भक्ताविरुद्ध भक्त,
तसे रक्ताविरुद्ध रक्त आहे.
निवडणूक भक्ताळली जात आहे,
निवडणूक रक्ताळली जात आहे !
निरोगी आणि निकोप लोकशाही,
सत्तेपोटी टाळली जात आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5602
दैनिक पुण्यनगरी
19ऑक्टोबर2019

वेड्यांचा बाजार

आजची वात्रटिका
-------------------------------------
वेड्यांचा बाजार
प्रचार सभामधील भाषणात,
नक्की तेज आणि ओज आहे.
सभेला हजर राहण्यासाठी,
पाचशे सहाशे रुपये रोज आहे.
बोलणारे भाडोत्री,ऐकणारे भाडोत्री,
सगळा मामला भाड्याचा आहे !
असेही वाटायला लागले,
सगळा बाजार वेड्याचा आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------------------
फेरफटका-7097
दैनिक झुंजार नेता
18ऑक्टोबर2019

प्रगती आणि अधोगती

आजची वात्रटिका
---------------------------------

प्रगती आणि अधोगती
शिक्क्यावरची निवडणूक
बटणावर आली आहे.
भाजी भाकरीवरची लोकशाही
मटणावर आली आहे.
कालची पवित्र लोकशाही
आता पुरती बाटली आहे !
बटणा मटणाच्या साक्षीला
देशी विदेशीची बाटली आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5601
दैनिक पुण्यनगरी
18ऑक्टोबर2019

Thursday, October 17, 2019

रामराज्य

रामराज्य



पूर्वी कधीच झाले नाही,

ते प्रत्यक्षात होवू शकते.

जाहीरनामे सत्यात उतरले तर,

रामराज्य प्रत्यक्षात येवू शकते.



पण असे काही,

अजून तरी झालेले नाही !

रामराज्य तर सोडून द्या,

पुरेसे सुराज्यही आलेले नाही !!


-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)

मोबाईल-9923847269

---------------------------------------

फेरफटका-7096

दैनिक झुंजार नेता

17ऑक्टोबर2019





























प्रचाराचा तोफखाना

आजची वात्रटिका
-------------------------------------
प्रचाराचा तोफखाना
कालही तोंडच्या वाफा होत्या,
आजही तोंडच्या वाफा आहेत.
जिकडे बघावे तिकडे,
प्रचारात धडाडत्या तोफा आहेत.
प्रबोधन सोडून प्रचाराच्या,
आज फैरीवर फैरी आहेत.
कालच्या प्रतिमाच,
आज आपल्या वैरी आहेत.
पैसा वसूल कार्यक्रम तरी,
म्हणे स्वाभिमान जिंदा आहे !
प्रबोधन काय?प्रचार काय?
शेवटी धंदा तो धंदा आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5600
दैनिक पुण्यनगरी
17ऑक्टोबर2019

Wednesday, October 16, 2019

आजची वात्रटिका
-------------------------------------
मज्जाच मज्जा
जसे तरुण तुर्क आहेत,
तसे म्हातारे अर्क आहेत.
सगळे आबालवृद्ध,
प्रचारामध्ये प्रचंड गर्क आहेत.
त्यांच्याकडे युवा फौज आहे,
यांच्याकडेही युवा फौज आहे !
युवा नेत्यांचे वय विचारून बघा,
मग कळेल त्यात काय मौज आहे ?
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5598
दैनिक पुण्यनगरी
15ऑक्टोबर2019
-----------------------------

नाट्य प्रयोग



आजच्या वात्रटिका
-------------------------------------
नाट्य प्रयोग
मतदार राजाला
वाट्टेल तसे पटवावे लागते.
लोकशाहीचे नाटक,
सत्तेसाठी वठवावे लागते.
लोकशाहीच्या नाटकाची
राजकीय तमाशाची नाळ असते !
ज्याचे नाटक यशस्वी,
त्याच्या गळ्यात सत्तेची माळ असते !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7095
दैनिक झुंजार नेता
16ऑक्टोबर2019
---------------------------------------
वाचा आणि इतरांनाही शेअर करा.
माझ्या दैनिक पुण्यनगरीतील
'चिमटा'
आणि दैनिक झुंजार नेता तील
'फेरफटका'
या सदरातील सतरा हजारांपैकी,
सहा हजारांहून जास्त निवडक
वात्रटिका
वाचण्यासाठी आणि इतरांना
शेअर करण्यासाठी क्लिक करा.
उर्वरीत
https://suryakantdolase.blogspot.in
-------------------------
#आजच्या_वात्रटिका

प्रचाराची 'वॉल' पेंटींग

आजची वात्रटिका
-------------------------------------
प्रचाराची 'वॉल' पेंटींग
पूर्वी घरादाराच्या भिंती रंगायच्या,
आता फेसबुकच्या रंगू लागल्या.
लोकशाहीच्या बदलाचे अपडेट्स,
सोशल मीडियावर सांगू लागल्या.
प्रचाराच्या भिंती जेवढ्या विषारी,
तेवढ्याच प्रभावी आणि छान आहेत !
ट्रोल बहाद्दरांनी लक्षात घ्यावे,
फेसबुकच्या भिंतीलाही कान आहेत !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5599
दैनिक पुण्यनगरी
15ऑक्टोबर2019

Monday, October 14, 2019

प्रचाराची चित्तरकथा

प्रचाराची चित्तरकथा

कुणी सैराट सुटलेले,
कुठे वातावरण तंग आहे.
कुठे अशी ही बनवाबनवी,
कुठे रंगलेला नटरंग आहे.

कुठे  हश्या वर हश्या,
कुठे टाळ्यावर टाळ्या आहेत !
निवडणुकीच्या तमाशा म्हणजे,
निव्वळ टाईमपासच्या खेळ्या आहेत !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7093
दैनिक झुंजार नेता
14ऑक्टोबर2019

Sunday, October 13, 2019

कोण जागा आहे?

आजची वात्रटिका
-------------------------------------
कोण जागा आहे?
हाही झोपलेला,तोही झोपलेला,
सांगा कुठे कोण जागा आहे?
लोकांचा झोपाळूपणा बघून,
डोक्याचा नुसता भुगा आहे.
सामाजिक बधिरता एवढी की,
लोकांच्या संवेदना मेल्या आहेत !
कोण जागा आहे?असे विचारीत,
अनेक पौर्णिमा येवून गेल्या आहेत !
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7092
दैनिक झुंजार नेता
13ऑक्टोबर2019

हात आणि अवलक्षण

आजची वात्रटिका
-------------------------------------
हात आणि अवलक्षण
उचलली जीभ लावली टाळ्याला,
शेवटी वाचा ती वाचा आहे.
हातवारे कळाले नाहीतर,
सगळा लोच्या एके लोच्या आहे.
प्रचाराच्या टायमिंगलाच,
हात दाखवून अवलक्षण आहे !
प्रचार कसा असू नये,
याचेच जणू लोकशिक्षण आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5594
दैनिक पुण्यनगरी
13ऑक्टोबर2019

Saturday, October 12, 2019

जाहीरनामा

आजची वात्रटिका
---------------------------------------
जाहीरनामा
निवडणुका आल्या की,
जो हमखास काढला जातो.
उर्वरीत पाच वर्षे मग,
जो अडगळीत पडला जातो.
लोकशाही परंपरा म्हणून,
जाहीरनामा तर काढला पाहिजे !
मागच्या जाहीरनाम्यावरून पुढे,
जाहीरनामा ओढला जातो !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7091
दैनिक झुंजार नेता
12ऑक्टोबर2019

खुळळ ss खुट्याक

आजची वात्रटिका
-------------------------------------
खुळ्ळ ss खुट्याक
सत्ता हाती येणार नाही,
हे पक्के कळून चुकले आहे.
डब्यांसोबत रेल्वेचे इंजिन,
रुळावरून खाली झुकले आहे.
ब्ल्यू प्रिंट गेली, व्हिडीओ गेले,
विरोधात बसायची इच्छा आहे !
कुणीतरी दबकत ओरडले,
हा सगळा ईडीचा पिच्छा आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5594
दैनिक पुण्यनगरी
12ऑक्टोबर2019
-----------------------------
वाचा आणि इतरांनाही शेअर करा.
माझ्या दैनिक पुण्यनगरीतील
'चिमटा'
आणि दैनिक झुंजार नेता तील
'फेरफटका'
या सदरातील सतरा हजारांपैकी,
सहा हजारांहून जास्त निवडक
वात्रटिका
वाचण्यासाठी आणि इतरांना
शेअर करण्यासाठी क्लिक करा.
उर्वरीत
https://suryakantdolase.blogspot.in
-------------------------
#आजच्या_वात्रटिका

Friday, October 11, 2019

विलीनीकरण

आजची वात्रटिका
-------------------------------------
विलीनीकरण
राजकारण स्वच्छ होण्याऐवजी,
जास्तच मलिन होऊ लागले.
नेते पक्षात विलीन होता होता,
आता पक्षच विलीन होऊ लागले.
कालचा स्वाभिमान,
आज गरजेपोटी लाचार आहे !
काल ज्यांना घातल्या शिव्या,
आज चक्क त्यांचाच प्रचार आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5593
दैनिक पुण्यनगरी
11ऑक्टोबर2019
---------------------------------------
वाचा आणि इतरांनाही शेअर करा.
माझ्या दैनिक पुण्यनगरीतील
'चिमटा'
आणि दैनिक झुंजार नेता तील
'फेरफटका'
या सदरातील सतरा हजारांपैकी,
सहा हजारांहून जास्त निवडक
वात्रटिका
वाचण्यासाठी आणि इतरांना
शेअर करण्यासाठी क्लिक करा.
उर्वरीत
https://suryakantdolase.blogspot.in
-------------------------
#आजच्या_वात्रटिका

दैनिक वात्रटिका19मार्च2024....वर्ष- तिसरे..अंक -286वा

दैनिक वात्रटिका 19मार्च2024....वर्ष- तिसरे.. अंक -286वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1-fbx6QEScldHj2QiABT650...