Wednesday, October 9, 2019

पंचनामाआजची वात्रटिका
-------------------------------------
पंचनामा
जे जे येतील ते,
पक्षात घेतले गेले.
जेवढे धुता येतील,
तेवढे धुतले गेले.
मित्र शत्रू झाले,
शत्रू मित्र झाले आहेत.
जे पदरी पडले,
ते पवित्र झाले आहेत.
त्यांची आणि यांची
सारखीच तऱ्हा आहे !
पक्षांतराचा पंचनामा,
झाला तो पुरा आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5591
दैनिक पुण्यनगरी
9ऑक्टोबर2019
--------------------------------------
वाचा आणि इतरांनाही शेअर करा.
माझ्या दैनिक पुण्यनगरीतील
'चिमटा'
आणि दैनिक झुंजार नेता तील
'फेरफटका'
या सदरातील सतरा हजारांपैकी,
सहा हजारांहून जास्त निवडक
वात्रटिका
वाचण्यासाठी आणि इतरांना
शेअर करण्यासाठी क्लिक करा.
उर्वरीत
https://suryakantdolase.blogspot.in
-------------------------
#आजच्या_वात्रटिका

No comments:

कायापालट