Wednesday, October 23, 2019

प्रीतीचा पाऊस

आजची वात्रटिका
-------------------------------------
प्रीतीचा पाऊस
आपल्याला प्रिय असो वा नसो,
तो पाऊस परतीचा असतो.
आपण निव्वळ निमताळे,
तो प्रियकर धरतीचा असतो.
आपण नेहमीच चिडचिडे,
कळत नाही पाऊस का रमला आहे?
पावसाला यावेच लागते,
शेवटी त्याच्या प्रीतीचा मामला आहे !
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5606
दैनिक पुण्यनगरी
23ऑक्टोबर2019

No comments:

अपप्रचाराचा पॅटर्न...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- अपप्रचाराचा पॅटर्न एकाच्या यशाने दुसऱ्याला, अपप्रचार करायला कटिबद्ध केले. अपप्रचाराने निवडणुक जिंक...