Monday, October 7, 2019

चवचालपणा



आजची वात्रटिका
-------------------------
चवचालपणा
जसे तोडाफोडीचे असते,
तसे तडजोडीचे असते.
जेवढे राजकारण कडू,
तेवढेच ते गोडीचे असते.
जशी ज्याची चाल,
तशी राजकारणाची चव असते !
राजकीय चवचालपणात,
सगळ्यांकडूच देव-घेव असते !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7088
दैनिक झुंजार नेता
7ऑक्टोबर2019

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...