Monday, October 7, 2019

अवमूल्यन



आजची वात्रटिका
-------------------------------------
अवमूल्यन
जम्माडी जम्मत आहे,
गम्माडी गंमत आहेत.
निवडणूकीच्या मोसमात,
ज्याला त्याला किंमत आहे.
ज्याला जे बकता येईल,
ते बिनधास्त बकले जाते !
अमूल्य असे मतदान,
अगदी बेभाव विकले जाते !
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5589
दैनिक पुण्यनगरी
7ऑक्टोबर2019
--------------------------------------
वाचा आणि इतरांनाही शेअर करा.
माझ्या दैनिक पुण्यनगरीतील
'चिमटा'
आणि दैनिक झुंजार नेता तील
'फेरफटका'
या सदरातील सतरा हजारांपैकी,
सहा हजारांहून जास्त निवडक
वात्रटिका
वाचण्यासाठी आणि इतरांना
शेअर करण्यासाठी क्लिक करा.
उर्वरीत
https://suryakantdolase.blogspot.in
-------------------------
#आजच्या_वात्रटिका

No comments:

यंत्र मंत्र आणि तंत्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------------- यंत्र मंत्र आणि तंत्र यंत्र,तंत्र आणि मंत्रांचा, निवडणुकीत वापर आहे. नाहीच मिळाले यश तर, मतदान ...