Thursday, October 10, 2019

शरणार्थी

आजची वात्रटिका
-------------------------------------
शरणार्थी
वेसणीमागे वेसण,
विरोधकांच्या नाकी आहे.
निकाल आधीच लागलेला,
फक्त लढाई बाकी आहे.
कुणी केली वळवळ,
कुणी माफीनाम्यावरती आले !
ज्यांनी ज्यांनी केले तह,
ते ते सगळे शरणार्थी झाले !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5592
दैनिक पुण्यनगरी
10ऑक्टोबर2019

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...