Thursday, October 24, 2019

निकालापूर्वीचा निकाल

आजची वात्रटिका
-------------------------------------
निकालापूर्वीचा निकाल
आरोप - प्रत्यारोपांचा कार्यक्रम
नको तेवढा बकाल असतो.
मतमोजणीच्या पूर्वीच,
बऱ्याच गोष्टींचा निकाल असतो.
नाती - गोती,निष्ठा - बिष्ठा,
यांची सगळी माती होते.
याचा अर्थ असा नाही की,
कुणा एकाचेच अती होते.
कुणी हारणार,कुणी जिंकणार,
हे सत्य तर त्रिकाल आहे !
सगळी वाट लागल्यावर कळते,
राजकारण फक्त गलिच्छ नाही,
ते नको तेवढे बकाल आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5607
दैनिक पुण्यनगरी
24ऑक्टोबर2019

No comments: