Monday, October 7, 2019

राजकीय मसणवटा

आजची वात्रटिका
-------------------------------------
राजकीय मसणवटा
जीवनाचे अंतिम सत्य,
मसणवट्यातच कळले जाते.
तरीसुद्धा मसणवट्यातही,
नीच राजकारण खेळले जाते.
खोटे दिलासे, खोटे सांत्वन,
खोटी श्रद्धांजली वाहिली जाते.
पोळी कशी भाजता येईल?
एवढीच गोष्ट पाहिली जाते.
मसणवट्यात सुटावी,
एवढी कशाला खाज पाहिजे?
लुच्च्यांना आणि बगलबच्च्यांना,
थोडी तरी लाज पाहिजे !
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7087
दैनिक झुंजार नेता
6ऑक्टोबर2019
--------------------------------------

No comments:

बोलून चालून ते गिबली आहे ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- बोलून चालून ते गिबली आहे सगळी दुनिया गिबली फोटोसाठी, फोटोसाठी राब राब राबली आहे. लोकांनी दिले काय? आले का...