Sunday, March 31, 2024

दैनिक वात्रटिका31मार्च2024....वर्ष- तिसरे..अंक -298वा

दैनिक वात्रटिका
31मार्च2024....वर्ष- तिसरे..
अंक -298वा 
पाने -45
अंक डाऊनलोड लिंक -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे

 

बंडोबा ते थंडोबा...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

बंडोबा ते थंडोबा

निवडणुकांच्या मोसमामध्येच
बंडोबांना कंड येऊ लागतात.
थोडे अंजारले गोंजारले की,
बंडोबाही थंड होऊ लागतात.

एक बंडोबा आखाडला की,
दुसरे बंडोबा आखडू लागतात.
पुराणातली वांगी,
बंडोबा नव्याने उकडू लागतात.

बंडोबांनी कितीही आव आणू द्या,
बंडोबा आंडोबा पांडोबा ठरतात !
बंडोबांनी कितीही ताव आणू द्या,
बंडोबा शेवटी थंडोबा ठरतात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8519
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
31मार्च2024
 

Saturday, March 30, 2024

दैनिक वात्रटिका30मार्च2024....वर्ष- तिसरे..अंक -297वा

दैनिक वात्रटिका
30मार्च2024....वर्ष- तिसरे..
अंक -297वा 
पाने -45
अंक डाऊनलोड लिंक -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे


 

मैत्रीपूर्ण लढत...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

मैत्रीपूर्ण लढत

आपलेच घोडे पुढे दामटत,
जो तो आघाडीचा अंत बघू लागतो.
आघाड्यात बिघाड्या झाल्या की,
मैत्रीपूर्ण लढतीचा मार्ग निघू लागतो.

मैत्रीपूर्ण लढत म्हणजे,
वरवरती लुटुपुटूची लढत असते.
विरोधकांच्याच पत्थ्यावरती,
मैत्रीपूर्ण लढत पडत असते.

कार्यकर्त्यांची भागते हौस,
कुणाचा कंडही जिरला जातो !
मैत्रीपूर्ण लढत म्हणजे,
आत्मघाती मार्ग ठरला जातो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8518
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
30मार्च2024
 

Friday, March 29, 2024

दैनिक वात्रटिका29मार्च2024....वर्ष- तिसरे..अंक -296वा


दैनिक वात्रटिका
29मार्च2024....वर्ष- तिसरे..
अंक -296वा 
पाने -45
अंक डाऊनलोड लिंक -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे
 

केविलवाणी अवस्था...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

केविलवाणी अवस्था

जिकडे बघावे तिकडे,
बंडाळी एके बंडाळी आहे.
कुठे खूपसला पाठीत खंजीर,
कुठे निष्ठेची खांडोळी आहे,

विश्वासपात्र नसणारांकडूनच,
विश्वासघाताची बोंबाबोंब आहे.
जसे तुळशी वृंदावनात,
फक्त गांज्याचेच ठोंब आहे.

फक्त स्वार्थ आणि स्वार्थावरच,
राजकारण्यांचा जीव आहे !
त्यांच्या केविलवाण्या तडजोडीमुळे,
त्यांचीच आता कीव आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8517
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
 

Thursday, March 28, 2024

दैनिक वात्रटिका28मार्च2024....वर्ष- तिसरे..अंक -295वा

दैनिक वात्रटिका
28मार्च2024....वर्ष- तिसरे..
अंक -295वा 
पाने -45
अंक डाऊनलोड लिंक -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे

 

खुली चर्चा...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

खुली चर्चा

कुठे फाटता फाटता जुळू लागले,
कुठे जुळता जुळता फाटू लागले.
उमेदवारीच्या तडजोडी म्हणजे,
संगीत खुर्ची सारखे वाटू लागले.

सगळे काही खुर्चीसाठी,
त्याची साग्र संगीत तयारी आहे.
कुठला मार्ग सरधोपट,
कुठला मार्ग मात्र भुयारी आहे.

कुठे चर्चेची चालली दमछाक,
कुणाकुणाचे मणकेच ढिले आहेत !
एकासोबत चर्चा चालू असताना,
सर्वांसाठीच पर्याय खुले आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8516
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
28मार्च2024
 

Wednesday, March 27, 2024

दैनिक वात्रटिका27मार्च2024....वर्ष- तिसरे..अंक -294वा


 दैनिक वात्रटिका
27मार्च2024....वर्ष- तिसरे..
अंक -294वा 
पाने -45
अंक डाऊनलोड लिंक -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे

गद्दारनामा....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

गद्दारनामा

फक्त एवढेच नाही की,
असे काही मतदार म्हणू लागले.
आज-काल गद्दारही,
दुसऱ्यांना गद्दार म्हणू लागले.

गद्दारच गद्दारांना सांगू लागले,
निष्ठाबिष्ठा काय असू शकते?
याच्यापेक्षा भयानक,
निष्ठेची चेष्टा काय असू शकते?

गद्दारीचे नवे नवे स्वरूप,
राजकीय पटलावर आले आहे!
पिसाळ आणि खोपडे यांनाही,
नव्याने इतिहास जमा केले आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8515
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
27मार्च2024
 

Tuesday, March 26, 2024

दैनिक वात्रटिका26मार्च2024....वर्ष- तिसरे..अंक -293वा


दैनिक वात्रटिका
26मार्च2024....वर्ष- तिसरे..
अंक -293वा 
पाने -45
अंक डाऊनलोड लिंक -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे
 

Monday, March 25, 2024

दैनिक वात्रटिका25मार्च2024....वर्ष- तिसरे..अंक -292वा


दैनिक वात्रटिका
25मार्च2024....वर्ष- तिसरे..
अंक -292वा 
पाने -45
अंक डाऊनलोड लिंक -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे
 

राजेशाहीचा पगडा...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------


राजेशाहीचा पगडा


लोकशाही म्हणजे काय?
प्रत्येकाला मोकळे पटांगण आहे.
त्यामुळेच लोकशाहीचेही,
राजेशाहीपुढे लोटांगण आहे.

लोकशाहीच्या वळचणीला,
हल्ली राजे महाराजे आहेत.
याची उदाहरणे जसे जुने,
तसे अगदीच ताजे आहेत.

लोकशाही आणि राजेशाही,
तसे तर विरुद्धार्थी शब्द आहेत !
तरीही लोकशाहीतले मतदार राजे,
राजेशाहीवरतीच लुब्ध आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8514
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
25मार्च2024
 

Sunday, March 24, 2024

दैनिक वात्रटिका24मार्च2024....वर्ष- तिसरे..अंक -291वा


दैनिक वात्रटिका
24मार्च2024....वर्ष- तिसरे..
अंक -291वा 
पाने -45
अंक डाऊनलोड लिंक -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे
संपादक,दैनिक वात्रटिका
 

उमेदवारांची उमेद....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

उमेदवारांची उमेद

ज्याला जे स्वप्न दिवसा दिसते,
त्याला तेच स्वप्न रात्री असते.
उमेदवार कोणताही असला तरी,
त्याला विजयाची खात्री असते.

कुणाचा आत्मविश्वास ठाम,
कुणाचा आत्मविश्वास फाजील असतो.
सगळ्यांचाच आत्मविश्वास बघून,
मतदार राजा मात्र खजील असतो.

जो दुनियेसाठी नियम असतो,
तोच निवडणुकीसाठी नियम आहे!
शेवटी आशा आणि स्वप्नांवरतीच,
आपली दुनियाही कायम आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8513
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
24मार्च2024
 

Saturday, March 23, 2024

दैनिक वात्रटिका23मार्च2024....वर्ष- तिसरे..अंक -290वा


दैनिक वात्रटिका
23मार्च2024....वर्ष- तिसरे..
अंक -290वा 
पाने -45
अंक डाऊनलोड लिंक -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे
संपादक,दैनिक वात्रटिका
 

स्पॉन्सर्स जिंदाबाद !...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

स्पॉन्सर्स जिंदाबाद !

क्रिकेट आणि राजकारण,
एकमेकात फिक्स आहे.
लोकसभा आणि आयपीएलचा,
डबल धमाका मिक्स आहे.

चौकार आणि षटकारांची,
दोन्हीकडेही बरसात आहे.
जनतेच्या तोंडी एकच वाक्य,
व्वा व्वा क्या बात आहे?

कुणी विजय;कुणी पराभव,
दणक्यात साजरे करत राहतात !
क्रिकेट आणि राजकारणात,
स्पॉन्सर्स गल्ले भरत राहतात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8512
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
23मार्च2024
 

Friday, March 22, 2024

दैनिक वात्रटिका22मार्च2024....वर्ष- तिसरे..अंक -289वा


दैनिक वात्रटिका
22मार्च2024....वर्ष- तिसरे..
अंक -289वा 
पाने -45
अंक डाऊनलोड लिंक -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे
संपादक,दैनिक वात्रटिका
 

निवडणूकीचे कंगोरे...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

निवडणूकीचे कंगोरे

कुणाला पाडायची संधी असते,
कुणाला जिंकावयाची संधी असते.
कोणतीही निवडणूक म्हटली की,
राजकीय सूडनाट्याची नांदी असते.

सगळा पंचवार्षिक हिशोब,
निवडणुकीत चुकता केला जातो.
आपली बुद्धी आणि बळ वापरून,
राजकीय शह दिला जातो.

विजयाचे सगळेच बाप होतात,
पराभव मात्र पोरका असतो !
प्रत्येकाच्याच चेहऱ्यावरती,
आपापला एक बुरखा असतो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8511
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
22मार्च2024
 

Thursday, March 21, 2024

दैनिक वात्रटिका21मार्च2024....वर्ष- तिसरे..अंक -288वा


दैनिक वात्रटिका
21मार्च2024....वर्ष- तिसरे..
अंक -288वा 
पाने -45
अंक डाऊनलोड लिंक -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे
संपादक,दैनिक वात्रटिका
 

गोपाळकाल्याचे सूत्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

गोपाळकाल्याचे सूत्र

जसा इकडे झाला आहे,
तसा तिकडेही झाला आहे.
एकूण काय तर सर्वच पक्षांचा,
चक्क गोपाळकाला आहे.

कुणाचा दुसऱ्या;कुणाचा तिसऱ्या,
तिसऱ्या चौथ्या पक्षात प्रवेश आहे.
घर वापसीच्या बाबतीतही,
अगदी सारखाच नमुना पेश आहे.

ज्यांच धिक्कार; त्यांचाच स्वीकार,
असेच आजचे राजकीय चित्र आहे !
आजची राजकीय अपरिहार्यता,
हेच गोपाळकाल्याचे सूत्र आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8510
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
21मार्च2024
 

Wednesday, March 20, 2024

दैनिक वात्रटिका20मार्च2024....वर्ष- तिसरे..अंक -287वा


दैनिक वात्रटिका
20मार्च2024....वर्ष- तिसरे..
अंक -287वा 
पाने -45
अंक डाऊनलोड लिंक -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे
संपादक,दैनिक वात्रटिका
 

साईड ट्रॅक....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

साईड ट्रॅक

झुक झुक करता करता,
इंजिन झुकायला लागले.
मुख्य ट्रॅकच्या बाजूला,
ट्रॅक टाकायला लागले.

समांतर रूळ कधीच,
एकमेकांना जुळत नाही.
इंजिनचे वागणे काही,
रेल्वे रुळाला कळत नाही.

कधी ठेंगा;कधी भोंगा,
गरगरलेला ब्रेन आहे !
हिरवा झेंडा दाखवते
ती बुलेट ट्रेन आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8509
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
20मार्च2024
 

Tuesday, March 19, 2024

दैनिक वात्रटिका19मार्च2024....वर्ष- तिसरे..अंक -286वा

दैनिक वात्रटिका
19मार्च2024....वर्ष- तिसरे..
अंक -286वा 
पाने -45
अंक डाऊनलोड लिंक -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे
संपादक,दैनिक वात्रटिका

 

लोकसभेचे पूर्वरंग..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

लोकसभेचे पूर्वरंग

जो तो भलताच लढाऊ आहे,
इकडून नाहीतर तिकडून लढतो आहे.
हा प्रकार एकीकडेच नाही तर,
आजकाल सगळीकडून घडतो आहे.

लढाईची इच्छा असेल तर,
इथे पक्षांची तरी कुठे कमी आहे?
तोच आपला पक्ष;तीच विचारधारा,
ज्यांच्याकडून तिकिटाची हमी आहे.

अवखळ नेत्यांच्या कानामध्ये,
पक्षांतराचा बेभान वारा आहे !
तिकीट सलामत तो पक्ष पचास,
हाच भावी उमेदवारांचा नारा आहे !

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8508
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
19मार्च2024
 

Monday, March 18, 2024

दैनिक वात्रटिका18मार्च2024....वर्ष- तिसरे..अंक -285वा

दैनिक वात्रटिका
18मार्च2024....वर्ष- तिसरे..
अंक -285वा 
पाने -45
अंक डाऊनलोड लिंक -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे
संपादक,दैनिक वात्रटिका

 

शाप आणि वरदान...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

शाप आणि वरदान

कुणाची आगीतून फुफाट्यात,
कुणाची फुफाट्यातूनआगीत उडी आहे.
कुणाची चालली घर वापसी,
कुणाकडून घराचीच फोडाफोडी आहे.

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती,
हे सगळे महाभारत घडते आहे.
एकाचे पक्षातून बाहेर जाणे,
दुसऱ्याच्या पथ्यावरती पडते आहे.

दरवेळी निवडणूक आली की,
दरवेळी हे असेच होऊन जाते !
कुणाचे काही तरी घेऊन जाताना,
कुणाला काहीतरी देऊन जाते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8507
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
18मार्च2024
 

Sunday, March 17, 2024

दैनिक वात्रटिका17मार्च2024....वर्ष- तिसरे..अंक -284वा


दैनिक वात्रटिका
17मार्च2024....वर्ष- तिसरे..
अंक -284वा 
पाने -45
अंक डाऊनलोड लिंक -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे
संपादक,दैनिक वात्रटिका
 

आचारसंहितेचा धसका...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

आचारसंहितेचा धसका

प्रत्यक्ष निवडणूक लढणारांपेक्षाही
हवालदिल मतदार राजा असतो.
निवडणुकीपेक्षा आचारसंहितेचाच,
नको त्यापेक्षा जास्त गाजावाजा असतो.

निवडणुका येतात जातात,
आचारसंहितेचाच धसका असतो.
जसा लग्नापेक्षाही महत्त्वाचा,
लोकांसाठी हळद -खिसका असतो.

निवडणुकीसाठी आचारसंहिता असते,
आचारसंहितेसाठी निवडणूक नाही !
भित्यापोटीच ब्रह्मराक्षस असतो,
त्यात मतदार राजाची काही चूक नाही !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8506
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
17मार्च2024
 

Saturday, March 16, 2024

दैनिक वात्रटिका16मार्च2024....वर्ष- तिसरे..अंक -283वा पाने -45


दैनिक वात्रटिका
16मार्च2024....वर्ष- तिसरे..
अंक -283वा 
पाने -45
अंक डाऊनलोड लिंक -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे
संपादक,दैनिक वात्रटिका
 

शॉक प्रूफ जनता...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

शॉक प्रूफ जनता

कुणाची चालली टिंगल टवाळी,
कुणाच्या जाहीर रेवड्या आहेत.
पहिला धक्का ओसरेपर्यंत,
नव्या भूकंपाच्या वावड्या आहेत.

जे जे दिवसा जमत नाही,
ते चक्क रात्री अपरात्री होते आहे.
राजकीय भूकंपाच्या वावड्यांची,
उदाहरणासहित खात्री होते आहे.

राज्यातल्या राजकीय भूकंपाचे,
अत्यंत विकृत असे रूप आहे !
आजकाल धक्केही नीट बसत नाहीत,
जनतासुद्धा आता शॉकप्रूफ आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8505
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
16मार्च2024
 

Friday, March 15, 2024

दैनिक वात्रटिका15मार्च2024....वर्ष- तिसरे..अंक -282 वा


दैनिक वात्रटिका
15मार्च2024....वर्ष- तिसरे..
अंक -282 वा 
पाने -45
अंक डाऊनलोड लिंक -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे
संपादक,दैनिक वात्रटिका
 

Thursday, March 14, 2024

दैनिक वात्रटिका14मार्च2024....वर्ष- तिसरे..अंक -281 वा


दैनिक वात्रटिका
14मार्च2024....वर्ष- तिसरे..
अंक -281 वा 
पाने -45
अंक डाऊनलोड लिंक -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे
संपादक,दैनिक वात्रटिका
 

उलटी गंगा...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

उलटी गंगा

कुणी दाखवतो उपयोगिता मूल्य,
कुणी उपद्रव मूल्य दाखवतो आहे.
कुठे एखादा चेलाच,
आपल्या गुरुलाच शिकवतो आहे.

कुठे आपलीच विद्या,
एखाद्या गुरूला फळते आहे.
ज्याच्या बुडाखाली आग लागली,
त्यालाच खरी धग कळते आहे.

कुठे चेले एवढे इरसाल झालेत की,
वाटते त्यांचा गुरुच कच्चा आहे !
ज्याचे उपद्रव मूल्य सर्वात जास्त,
वाटते नेमका तोच सच्चा आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8504
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
14मार्च2024
 

Wednesday, March 13, 2024

दैनिक वात्रटिका13मार्च2024....वर्ष- तिसरे..अंक -280 वा पाने -45

दैनिक वात्रटिका
13मार्च2024....वर्ष- तिसरे..
अंक -280 वा 
पाने -45
अंक डाऊनलोड लिंक -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे
संपादक,दैनिक वात्रटिका

 

लोकसभा तिकीट...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

लोकसभा तिकीट

कुणी कुणी तळ्यात आहे,
कुणी कुणी मळ्यात आहे.
हवे त्याला मिळत नाही,
नको त्याच्या गळ्यात आहे.

कुणाची चालली घालमेल,
कुणाचा राजकीय नखरा आहे.
ज्याचे त्याला कळून चुकले,
आपला बळीचा बकरा आहे.

कुणासाठी वरदान,
कुणासाठी साखरेची सुरी आहे !
ज्यांना दिल्लीची ॲलर्जी,
त्यांना आपली मुंबईच बरी आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8503
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
13मार्च2024
 

Tuesday, March 12, 2024

दैनिक वात्रटिका12मार्च2024....वर्ष- तिसरे..अंक -279 वा


दैनिक वात्रटिका
12मार्च2024....वर्ष- तिसरे..
अंक -279 वा 
पाने -45
अंक डाऊनलोड लिंक -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे
संपादक,दैनिक वात्रटिका



 

कॉमन फॅक्टर...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------
कॉमन फॅक्टर
तिकीट वाटपाच्या कार्यक्रमात,
सर्व पक्षांची एक वाक्यता असते.
त्यालाच करतात तिकीट बहाल,
ज्याची जिंकण्याची शक्यता असते.
जात-पात, गुंडागर्दी,पैसा-अडका,
यांचाही एकसारखा विचार असतो.
परस्परांना लाज आणील,
असाच तर सर्वांचा प्रचार असतो.
सर्वांचे असते सारखी थिअरी,
सर्वांचे प्रॅक्टिकलही एक असते !
सगळे एकाच गुरुचे चेले,
हीच यातली राजकीय मेख असते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8502
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
12मार्च2024

 

Monday, March 11, 2024

दैनिक वात्रटिका11मार्च2024....वर्ष- तिसरे..अंक -278 वा

दैनिक वात्रटिका
11मार्च2024....वर्ष- तिसरे..
अंक -278 वा 
पाने -45
अंक डाऊनलोड लिंक -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे
संपादक,दैनिक वात्रटिका

 

नो गॅरंटी...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

नो गॅरंटी

कोण कुणाच्या सोबत आहे?
कोण कोणाच्या विरोधात आहे?
कसलाच ताळाला मेळ नसल्याने,
सगळ्यांचे घोडे पेंड खात आहे.

आज आपण कुठे आहोत?
याचासुद्धा कूणाला पत्ता नाही.
उद्या आपण कुठे असूत?
याचीसुद्धा गॅरंटी आत्ता नाही.

उगीच कुणी सरळ वाट सोडून,
कुणी वाकडी वाट धरली नाही !
राजकारणाचीच राजकारणाला,
हल्ली तर मुळीच गॅरेंटी उरली नाही !

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8501
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
11मार्च2024
 

Sunday, March 10, 2024

दैनिक वात्रटिका10मार्च2024....वर्ष- तिसरे..अंक -277 वा


दैनिक वात्रटिका
10मार्च2024....वर्ष- तिसरे..
अंक -277 वा 
पाने -45
अंक डाऊनलोड लिंक -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे
संपादक,दैनिक वात्रटिका
 

राजकीय कुसंगत...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

राजकीय कुसंगत

आचारसंहिता म्हणजे खोळंबा,
एवढाच आपला आडाखा आहे.
राष्ट्रीय महापुरुषांना सुद्धा,
आता आचारसंहितेचा तडाखा आहे.

पक्ष - पक्षाचा आणि जातीपातीचा,
महापुरुषांवरतीही शिक्का आहे.
म्हणूनच महापुरुषांच्या प्रतिमानांही,
आता आचारसंहितेमुळे धक्का आहे.

काढून टाका; झाकून टाका,
आचारसंहितेची नियमावली आहे !
राजकीय कुसंगतीमुळे,
महापुरुषांची ही गत झाली आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8500
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
10मार्च2024
 

Saturday, March 9, 2024

दैनिक वात्रटिका 9मार्च2024....वर्ष- तिसरे..अंक -276वा

दैनिक वात्रटिका
9मार्च2024....वर्ष- तिसरे..
अंक -276वा 
पाने -45
अंक डाऊनलोड लिंक -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाईल.
-सूर्यकांत डोळसे
संपादक,दैनिक वात्रटिका



 

धोक्याची घंटा...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

धोक्याची घंटा

आजची ताटाखालची मांजर,
कालचे गुरगुरणारे बोके होते.
त्यांच्या कधीच लक्षात आले नाही,
भविष्यामध्ये कोणते धोके होते.

म्याव म्याव करणाऱ्या मांजरांची,
हातानेच गळ्यामध्ये घंटा आहे.
वाढत्या जळफळाटामुळे,
मांजरा मांजरांमध्येच तंटा आहे.

हमारी बिल्ली हमकोच म्यावं..
याची जाणीव मांजरा मांजरा आहे !
मांजरांच्या भोवताली तर,
मांजरांनी लावलेला पिंजरा आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8499
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
9मार्च2024
 

Friday, March 8, 2024

दैनिक वात्रटिका8मार्च2024....वर्ष- तिसरे..अंक -275वा पाने -45

दैनिक वात्रटिका
8मार्च2024....वर्ष- तिसरे..
अंक -275वा 
पाने -45
अंक डाऊनलोड लिंक -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाईल.
-सूर्यकांत डोळसे
संपादक,दैनिक वात्रटिका

 

सावधानता....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

सावधानता

महिला दिन आला की,
तीच उत्सव मूर्ती असते.
महिला दिना पुरती तरी,
कीर्ती आणि आरती असते.

एका दिवसाच्या आरतीला,
तीसुद्धा सहज बळी पडते.
स्वतःवरती हसताना,
तिच्या गाली खळी पडते.

एक दिवसीय कौतुकापासून,
तिने सावध राहायला हवे !
आठ मार्च पलीकडे अलीकडे,
तिने सतत पहायला हवे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8498
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
8मार्च2024
 

Thursday, March 7, 2024

दैनिक वात्रटिका7मार्च2024....वर्ष- तिसरे..अंक -274वा

दैनिक वात्रटिका
7मार्च2024....वर्ष- तिसरे..
अंक -274वा 
पाने -45
अंक डाऊनलोड लिंक -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाईल.
-सूर्यकांत डोळसे
संपादक,दैनिक वात्रटिका

 

पोल - खोल...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

पोल - खोल

नेते आणि कार्यकर्ते तेच,
झेंडा आणि गोंडा वेगळा आहे.
बुडखा आणि खोड तेच,
फक्त वरचा शेंडा वेगळा आहे.

वरचा शेंडा वेगळा असला तरी,
ते नाक उचलून बोलत आहेत.
एकमेकांची पोल सुद्धा,
अगदी मुळापासून खोलत आहेत.

त्यांची चालली पोल खोल,
जोरात एकमेकांचे उणेदुणे आहे !
लोकांना पश्चाताप व्हायला लागला,
हे तर आपणच पेरलेले बेणे आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8497
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
7मार्च2024
 

Wednesday, March 6, 2024

दैनिक वात्रटिका6मार्च2024....वर्ष- तिसरे..अंक -273वा


दैनिक वात्रटिका
6मार्च2024....वर्ष- तिसरे..
अंक -273वा 
पाने -40
अंक डाऊनलोड लिंक -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाईल.
-सूर्यकांत डोळसे
संपादक,दैनिक वात्रटिका
 

जागा वाटपाची तडजोड...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डॊळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------------------

जागा वाटपाची तडजोड

लोकसभेच्या वाटाघाटीत,
विधानसभेचा पाय अडकला आहे.
जागा वाटपाच्या समीकरणात,
ज्याचा त्याचा झेंडा फडकला आहे.

कुणाला लोकसभा महत्त्वाची,
कुणाला विधानसभा महत्त्वाची आहे.
जागा वाटपाच्या तडजोडी करताना,
परीक्षा आपल्याच सत्वाची आहे.

भोवतालचा बघायची सवय झाली,
कारण आंधळे उरावर स्वार आहे !
जिकडे बघावे तिकडे,
तोंड दाबून बुक्क्यांचा मार आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8496
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
6मार्च2024

 

DAILY VATRATIKA...27APRIL2024