Thursday, March 28, 2024

खुली चर्चा...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

खुली चर्चा

कुठे फाटता फाटता जुळू लागले,
कुठे जुळता जुळता फाटू लागले.
उमेदवारीच्या तडजोडी म्हणजे,
संगीत खुर्ची सारखे वाटू लागले.

सगळे काही खुर्चीसाठी,
त्याची साग्र संगीत तयारी आहे.
कुठला मार्ग सरधोपट,
कुठला मार्ग मात्र भुयारी आहे.

कुठे चर्चेची चालली दमछाक,
कुणाकुणाचे मणकेच ढिले आहेत !
एकासोबत चर्चा चालू असताना,
सर्वांसाठीच पर्याय खुले आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8516
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
28मार्च2024
 

No comments:

खाते वाटप ..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- खाते वाटप कुणाला आवडीचे भेटले गेले, कुणाला नावडीचे भेटले गेले. जे जे बिन खात्याचे मंत्री होते, त्य...