Friday, March 22, 2024

निवडणूकीचे कंगोरे...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

निवडणूकीचे कंगोरे

कुणाला पाडायची संधी असते,
कुणाला जिंकावयाची संधी असते.
कोणतीही निवडणूक म्हटली की,
राजकीय सूडनाट्याची नांदी असते.

सगळा पंचवार्षिक हिशोब,
निवडणुकीत चुकता केला जातो.
आपली बुद्धी आणि बळ वापरून,
राजकीय शह दिला जातो.

विजयाचे सगळेच बाप होतात,
पराभव मात्र पोरका असतो !
प्रत्येकाच्याच चेहऱ्यावरती,
आपापला एक बुरखा असतो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8511
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
22मार्च2024
 

No comments:

खाते वाटप ..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- खाते वाटप कुणाला आवडीचे भेटले गेले, कुणाला नावडीचे भेटले गेले. जे जे बिन खात्याचे मंत्री होते, त्य...