आजची वात्रटिका
-------------------------
लोकसभेचे पूर्वरंग
जो तो भलताच लढाऊ आहे,
इकडून नाहीतर तिकडून लढतो आहे.
हा प्रकार एकीकडेच नाही तर,
आजकाल सगळीकडून घडतो आहे.
लढाईची इच्छा असेल तर,
इथे पक्षांची तरी कुठे कमी आहे?
तोच आपला पक्ष;तीच विचारधारा,
ज्यांच्याकडून तिकिटाची हमी आहे.
अवखळ नेत्यांच्या कानामध्ये,
पक्षांतराचा बेभान वारा आहे !
तिकीट सलामत तो पक्ष पचास,
हाच भावी उमेदवारांचा नारा आहे !
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8508
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
19मार्च2024
No comments:
Post a Comment