आजची वात्रटिका
-------------------------
धोक्याची घंटा
आजची ताटाखालची मांजर,
कालचे गुरगुरणारे बोके होते.
त्यांच्या कधीच लक्षात आले नाही,
भविष्यामध्ये कोणते धोके होते.
म्याव म्याव करणाऱ्या मांजरांची,
हातानेच गळ्यामध्ये घंटा आहे.
वाढत्या जळफळाटामुळे,
मांजरा मांजरांमध्येच तंटा आहे.
हमारी बिल्ली हमकोच म्यावं..
याची जाणीव मांजरा मांजरा आहे !
मांजरांच्या भोवताली तर,
मांजरांनी लावलेला पिंजरा आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8499
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
9मार्च2024
No comments:
Post a Comment