आजची वात्रटिका
-------------------------
ज्यांना तुरुंगात टाकायला निघाले
एकेकाची राजकीय महत्त्वाकांक्षा,
बघा किती राक्षसी आहे ?
ज्यांना तुरुंगात टाकायला निघाले,
त्यांनाच उमेदवारीची बक्षिसी आहे.
जणू पक्षात पडले पवित्र झाले,
पापा बरोबर पुण्यालाही फाटा आहे.
ज्यांना तुरुंगात टाकायला निघाले,
त्यांनाच थेट सत्तेमध्ये वाटा आहे.
काळया कारनाम्यायावर काढलेल्या,
व्हाईट पेपरचीही आता रद्दी आहे !
ज्यांना तुरुंगात टाकायला निघाले,
त्यांचीच आता राजकीय सद्दी आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8494
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
4मार्च2024
No comments:
Post a Comment