Tuesday, March 12, 2024

कॉमन फॅक्टर...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------
कॉमन फॅक्टर
तिकीट वाटपाच्या कार्यक्रमात,
सर्व पक्षांची एक वाक्यता असते.
त्यालाच करतात तिकीट बहाल,
ज्याची जिंकण्याची शक्यता असते.
जात-पात, गुंडागर्दी,पैसा-अडका,
यांचाही एकसारखा विचार असतो.
परस्परांना लाज आणील,
असाच तर सर्वांचा प्रचार असतो.
सर्वांचे असते सारखी थिअरी,
सर्वांचे प्रॅक्टिकलही एक असते !
सगळे एकाच गुरुचे चेले,
हीच यातली राजकीय मेख असते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8502
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
12मार्च2024

 

No comments:

खाते वाटप ..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- खाते वाटप कुणाला आवडीचे भेटले गेले, कुणाला नावडीचे भेटले गेले. जे जे बिन खात्याचे मंत्री होते, त्य...