Sunday, March 24, 2024

उमेदवारांची उमेद....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

उमेदवारांची उमेद

ज्याला जे स्वप्न दिवसा दिसते,
त्याला तेच स्वप्न रात्री असते.
उमेदवार कोणताही असला तरी,
त्याला विजयाची खात्री असते.

कुणाचा आत्मविश्वास ठाम,
कुणाचा आत्मविश्वास फाजील असतो.
सगळ्यांचाच आत्मविश्वास बघून,
मतदार राजा मात्र खजील असतो.

जो दुनियेसाठी नियम असतो,
तोच निवडणुकीसाठी नियम आहे!
शेवटी आशा आणि स्वप्नांवरतीच,
आपली दुनियाही कायम आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8513
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
24मार्च2024
 

No comments:

खाते वाटप ..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- खाते वाटप कुणाला आवडीचे भेटले गेले, कुणाला नावडीचे भेटले गेले. जे जे बिन खात्याचे मंत्री होते, त्य...